वळके येथे प्रौढाची गळफास घेत आत्महत्या

रत्नागिरी:- तालुक्यातील वळके येथे प्रौढाने अज्ञात कारणातून जुन्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवार 21 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडली. रविंद्र मधुकर सावंत (56, रा.वळके मराठवाडी,रत्नागिरी) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या प्रौढाचे नाव आहे.

बुधवारी दुपारी घरामध्ये जेवण झाल्यानंतर रविंद्र सावंत हे मी जुन्या घरी जातो असे आपल्या नातेवाईकांना सांगून निघून गेले होते. परंतू बराच वेळ झाला तरीही ते न परतल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी जुन्या घरी जाउन पाहिले असता त्यांना रविंद्र सावंत जुन्या घराच्या लाकडी वाशाला नायलॉन दोरीने गळफास लावून लोंबकळत असलेल्या स्थितीत दिसून आले. नातेवाईकांनी त्यांच्या गळ्यातील रस्सी सोडूवन ग्रामीण रुग्णालय पाली येथे दाखल केले असता तेथील वैद्यकिय अधिकार्‍यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.