लोटे एमआयडीसीचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम 

रत्नागिरी:- लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांना कामासाठीचे पाणी पुरवणारी जलवाहिनी दुरुस्तीचे काम चालू असतानाच गळती लागली आहे. तथापि दुरुस्ती पूर्वीच प्रस्तावित करण्यात आली होती. सोमवारी औद्योगिक क्षेत्रास सुट्टी असते. त्यामुळे ही दुरुस्ती हाती घेण्यात आली असून आज सायंकाळपर्यंत येथील पाणीपुरवठा सुरळीत होईल असे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे कळवण्यात आले आहे.

पत्रकानुसार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ चिपळूण उपविभागा मार्फत लोटे -परशुराम औद्योगिक क्षेत्रासाठी पाणी पुरवठा करणारी अशुद्ध जलवाहिनीचे काम वालोंपे आज सायंकाळ 6 पर्यंत सुरु होणार आहे. 1982 ला टाकण्यात आलेली जलवाहिनी कमकुवत झाली आहे. परिणामी पाईपलाईन वारंवार फुटत असल्या कारणाने तो भाग बदलने जरुरीचे होते. त्याची पूर्व कल्पना इंडस्ट्रियल असोसिएशनला दिली आहे.

कंपन्या बंद असल्यामुळे काल रात्रीपासून काम सुरु आहे. आज पाईप मोकळा करत असताना खोदाईच्या कामामुळे काही कारणाणे पाईपला गळती लागली. परंतु तो कामाचाच भाग आहे. मात्र आज सायंकाळपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती महामंडळ उपविभाग चिपळूणच उपाभियंता यांनी दिली आहे.