लॉकडाऊन काळातही दुकान सुरु ठेवल्याने पोलिसांची कारवाई

रत्नागिरी:– कोरोना साखळी तोडण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कडक लॉकडाउन असतानाही आपले दुकान उघडे ठेवून साहित्याची विक्री केली.याप्रकरणी दुकान मालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवार 7 जून रोजी सकाळी 8.50 वा.सुमारास छत्रपती शिवाजी स्टेडिअम पाठीमागे असलेल्या बालाजी मार्केट या दुकानात करण्यात आली.

भोलाराम भानाराम चौधरी (32) आणि दिलीप आसाराम चौधरी (20,दोन्ही रा.हिंदु कॉलनी, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित दुकान मालकांची नावे आहेत.याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज भोसले यांनी तक्रार दिली आहे.त्यानूसार हे दोघे दुकानाचा दरवाजा उघडून ग्राहकांना साहित्याची विक्री करत होते.याबाबत अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.