रत्नागिरी:- जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने लॉकडाउन करायचे की नाही, याबाबत जिल्हाधिकारी यांना निर्णय घेण्याचे अधिकार अधिकार देण्यात आलेले आहेत. यामुळे गणेशोत्सवानंतर जिल्ह्यात लॉकडाऊन करायचे अथवा नाही याबाबत जिल्हाधिकारीच निर्णय घेतील असे ना. उदय सामंत यांनी सांगितले.
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात परत लॉकडाउन होणार का, असा प्रश्न ना. सामंत यांना विचारला. तेव्हा ते म्हणाले की, याबाबत दोन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी निर्णय घेतील. मात्र जिल्ह्यात रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता लॉकडाउनचा निर्णय होऊ शकतो. कारण ही कोरोनाची साखळी तोडण आवश्यक आहे. मात्र याबाबत दोन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी निर्णय घेतील. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. परंतु हे मृत्यूची वर्गवारी केली, तर ७५ टक्के मृत्यू ६५ वर्षांवरील रुग्णांचे झाले असून त्यांना इतर आजारांचीही पार्श्वभूमी आहे. तरीदेखील मृत्यूचा दर कमी करण्यासाठी टास्क फोर्सशी चर्चा करून जिल्हाधिकारी निर्णय घेतील. पुढील काळात कोरोनाच्या उपचारासाठी खाजगी रुग्णालयांची आवश्यकता असल्यास त्याबाबतही निर्णय घेण्यात येईल, असेही श्री. सामंत यांनी सांगितले.