रत्नागिरी:- मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतील महिलांच्या अर्जांची छाननी सुरू झाली आहे. यामध्ये स्वतःहुन महिलांनी आपण लाभातून माघार घेत असल्याचे कळवायचे आहे, अन्य़था छाननीत हे अर्ज बाद होणार आहेत. जिल्ह्यात 4 लाख 17 लाख लाभार्थी महिला आहेत. त्यापैकी फक्त 4 महिलांनी या योजनेतून माघार घेत असल्याचे कळविले आहेत. निकषात बसण्यासाठी उर्वरित सर्व अर्जांची छाननी करूनच पुढील लाभ दिला जाणार आहे.
महायुतीच्या शासनाने गेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकी दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी लाडकी बहिण योजना राबविली. महिलांना महिन्याला 1500 रुपये देण्याचे जाहिर केले. त्याचा लाभ सुरू झाल्यानंतर अनेक महिलांनी ही योजना उचलून धरली. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असलेले राजकीय वातावरण योजनेने बदलुन टाकले. त्यामुळे शासनने या योजनेचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमात सुरू केला. तालुका -तालुक्यात महिला मेळावे सुरू ठेवले. जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ व्हावा, यासाठी शासनाकडुन प्रशासनाला सूचना देण्यात आल्या. जिल्ह्यात सुमारे 4 लाख 17 हजार महिला या योजनेच्या लाभार्थी झाल्या.
जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत योजना राबविण्यात येत आहे. निवडणुकांमध्ये महायुतीला योजनेचा मोठा फायदा झाला. परंतु आता नव्याने सत्ता स्थापन झाल्यानतंर योजनेवर होणाऱ्या खर्चावर नियंत्रण आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्याअऩुषंगाने शासनाने निकषामध्ये बसण्यासाठी अर्जांची छाननी सुरू केली आहे. ज्यांच्या घरात चारचाकी आहे, आयकर भरत असणाऱे, चांगल्या नोकरीत असणाऱे, इतर योजनेचा फायदा घेणाऱे आदींना यातून वगळण्यात येणार आहे. अनेक महिलांना स्वतःहुन या योजनेतून माघार घेण्यास सांगितले आहे. शासनाने आवाहन केल्यानुसार जिल्ह्यातील 4 लाभार्थ्यांनीच या योजनेतून माघार घेतली आहे. उर्वरित अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू आहे.