रत्नागिरी:- जिल्ह्यात प्रथमच लाच घेण्याची ऑफर देणाऱ्याला अँटी करप्शन विभागाने रंगेहाथ पकडले आहे. सहायक पोलीस निरिक्षक यांच्या तक्रारी नंतर लाचेची ऑफर देणाऱ्या खेड मधील लाकूड व्यावसायिकाला रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
खेड येथे लोटे दुरक्षेत्राचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय बाळू कदम हे कार्यरत आहेत. लाकडाचे व्यावसायीक असणाऱ्या निजाम हुसेन पटाईत (50, गोवळकोट, चिपळूण) यांचा लाकूड वाहतूक करणारा ट्रक हा उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांनी कारवाई करून लोटे पोलिस दुरक्षेत्र येथे ठेवला होता. त्यानंतर निजाम हुसेन पटाईत यांनी त्याबाबत झालेला दंड भरला. पुढे या ट्रक मधील असलेल्या लाकडाबाबत वनविभाग यांना कारवाईच्या अनुशंगाने प्रस्ताव न पाठवता ट्रक लाकडासह सोडून देण्यासाठी लाकूड व्यावसायिक पटाईत पोलीस निरीक्षक कदम यांना वारंवार लाच देण्याचे आमिष दाखवत होते. 5 हजारावरून 3 हजाराची लाच देण्याचे ठरवले ही रक्कम देताना निजाम हुसेन पटाईत यांना पकडण्यात आले.
हा सापळा अधिकारी सुशांत चव्हाण, पोलीस उप-अधीक्षक ला.प्र.वि., रत्नागिरी यांच्यासह सापळा पथक स.फौ.संदीप ओगले, पो. ह. विशाल नलावडे, पोना. दीपक आंबेकर, पोशी अनिकेत मोहिते यांनी कामगिरी केली.