लाकडाची विना परवाना वाहतूक करणारा ट्रक ताब्यात

चिपळूण:- वनविभागाकडून सुरू असलेल्या शोध मोहिमेत शुक्रवारी खडपोली एमआयडीसीत विनापरवाना लाकूड वाहतुक करणारा ट्रक जप्त करण्यात आला. या प्रकरणी वनविभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

गेले आठवडाभर जंगलतोडीवरून पर्यावरणप्रेमीनी वनविभागाला धारेवर धरले. सोशल मिडियातून या बाबत सातत्याने सवाल उपस्थित केले गेल्यानंतर वनविभागाकडून शोधकार्य हाती घेण्यात आले. यातून शुक्रवारी 1 ट्रक लाकूड वाहतूक करत असल्यी गुप्त माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानंतर या वाहतूक करणाऱ्या ट्रकचां शोध वनविभागाकडून घेण्यात आला. बराच काळ कराड रस्त्यावर सती ते पिंपळी या भागात गस्त घातल्यानंतर खडपोली एमआयडीसीमध्ये रात्री 10.30च्या सुमारास परिक्षेत्र वनाधिकारी राजश्री कीर यांना अवैध लाकूड वाहतूक करणारा ट्रक निदर्शनास आला. त्यानुसार या ट्रकची प्राथमिक चौकशी केली असता तो विनापासींग असल्याचे आढळले. भारतीय वन अधिनयम 1927 चे कलम 41 (2) (ब) अन्वये विनापरवाना वाहतुकीचा गुन्हा दाखल करुन हा ट्रक लाकडासह जप्त करून ताब्यात घेण्यात आला. या ट्रकमध्ये 29.744 घ. मी. जळावू, मनाई बिगर मनाई लाकूड माल आढळल्याने तत्काळ वन गुन्हा दाखल केला गेला आहे. ही विनापरवाना अवैध वाहतूक जितेंद्र शांताराम शिंदे (ओवळी, ािापळूण) यांनी केली आहे. या अवैध लाकूड वाहतूक करणाऱ्या वाहनाचा व जप्त केलेल्या लाकूड मालाचा पुढील तपास सुरू आहे.