लांजा शांतीनगर येथे भावा-भावामध्ये राडा

रत्नागिरी:- लांजा तालुक्यातील शांतीनगर येथे जाण्या-येण्याच्या वाटेवरुन भावा-भावामध्ये राडा झाला. या राड्यात चुलत भावाने लोखंडी कडे डोक्यात मारुन जखमी केले. अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ओशन कैलास दळी, कैलास श्रीधऱ दळी व ओवी ओशन दळी अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना शुक्रवारी (ता. २२) सकाळी अकराच्या सुमारास शांतीनगर येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी आकाश तुषारकांत दळी (वय ३१, रा. शांतीनगर,
लांजा) यांचा चुलतभाऊ यांच्यात वाटेवरुन जाण्या येण्यावरुन वाद झाला. वादातचे रुपान्तर मारहाणीत झाले. संशयितांनी आकाश दळी व त्यांची पत्नी आराध्या दळी यांनी मारहाण केली. या मारहाणीत ओशन याने आकाशची मान आवळून डोक्यात लोखंडी
कड्याने प्रहार केला. यामध्ये तो जखमी झाला. तर पत्नीला हाताच्या थापटाने मारहाण केली. जखमी आकाशला लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संशयितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशीरा पर्यत सुरु होती.