लांजा:- लांजा येथील अवघड वळण असलेल्या वेरळ घाटात शुक्रवारी अपघात झाला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरला शुक्रवार 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.30 ते 1 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. अपघातानंतर मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती.
कंटेनर चालकाला वेरळ येथील अवघड वळणावर अंदाज न आल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि कंटेनरला मोठा अपघात झाला. या अपघातात चालकाने गाडीबाहेर उडी मारल्याने सुदैवाने बचावला. अपघाताची माहिती
मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अपघातानंतर महामार्गावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी छोट्या गाड्यांना वाट मोकळी करून देत थोड्या प्रमाणात वाहतूक कमी करण्यात आली. मात्र मोठी वाहने अडकून पडली होती. सध्या क्रेनच्या सहाय्याने कंटेनरला बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.