लांजा:- लांजातील पडवण गावच्या हद्दीतील रेल्वे ब्रिजच्याखाली नदीच्या किनार्या लगत एका 30 वर्षीय तरुणाची कवटी फुटून गंभीर दुखापत झालेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला. त्याच्या डाव्या हाताची बोटे तुटलेली आहेत. त्याच्या छातीवर तरुणीचे नाव आहे. प्रेमप्रकरणातून आत्महत्या किंवा घातपात? याबाबत शक्यता वर्तवली जात आहे. या तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या 30 वर्षीय तरुणाची कवटी फुटून उघडया स्थितीत आढळून आला. त्याची उंची सुमारे 5 फुट 2 इंव असून छातीवर इंग्रजीमध्ये रवीना व जानू असे इंग्रजीत नाव गोंदवलेले आहे. उजव्या हाताच्या मनगटात स्टीलचे कडे आहे. तर डाव्या हाताची करंगळी व बाजूची बोटे तुटलेल्या स्थितीत आढळून आली आहे. यावरुन प्रेमप्रकरणातून आत्महत्या किंवा घातपाताची शक्यता असावी असा अंदाज पोलीसांकडून वर्तवला जात असून त्या दृष्टीने तपास सुरु आहे.