लांजा येथील वाटूळ घाटात कंटेनर पलटी होऊन चालक जखमी

लांजा:- मुंबई – गोवा महामार्गावरील वाटूळ येथील अवघड वळणावर कंटेनर पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात कंटेनर चालक जखमी झाल्याची घटना २८ डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली. 

सविस्तर वृत्त असे की, गोव्यावरुन मुंबईच्या दिशेने कंटेनर चालक मॅगी घेवून जात होता. वाटूळ येथील अवघड वळणावर आल्यानंतर त्याचा गाडीवरील ताबा सुटला. ब्रेक लावण्याचा प्रयत्न करत असताना ब्रेक न लागल्याने कंटेनर दुसर्‍या बाजूला जावून पटली झाला. या अपघातामुळे काही वाहतूक ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळताच लांजा पोलीस आणि होमगार्ड दीपक दिवाळे, रवींद्र ताम्हणकर यांनी घटनास्थळी जावून एकेरी वाहतूक सुरु केली. अद्यापपर्यंत एकेरी वाहतूक सुरु आहे.