लांजा तालुक्यात ३२ ग्रामपंचायतीमध्ये महिलाराज

लांजा:- तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत मंगळवारी लांजा येथे काढण्यात आली. यामध्ये सर्वसाधारणसाठी २०, सर्वसाधारण स्त्रीसाठी २०, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ८ आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रीसाठी ८, त्याचप्रमाणे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जाती स्री साठी प्रत्येकी २ याप्रमाणे ६० ग्रा.पं. च्या सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले.
लांजा तालुक्यातील एकूण ६० ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम लांजा शहरातील संकल्प सिद्धी सभागृहात पार पडला.

यावेळी व्यासपीठावर लांजा तहसीलदार प्रियांका ढोले, निवासी नायब तहसीलदार अनिल गोसावी, महसूल नायक तहसीलदार सुरेंद्र भोजे तसेच पुनस मंडळ अधिकारी रोहिदास राठोड,लांजा मंडळ अधिकारी तलाठी संतोष हांदे आदी उपस्थित होते.
आरक्षण सोडत लांजा जिल्हा परिषद शाळा क्रमांक पाचचा विद्यार्थी हार्दिक सुरेश कोपरे याच्या हस्ते काढण्यात आली. यावेळी शिक्षक विश्वनाथ सुर्वे उपस्थित होते.

यावेळी काढण्यात आलेले सरपंचांचे आरक्षण पुढीलप्रमाणे – तालुक्यातील एकूण ६० पैकी २० ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण काढण्यात आले आहे. यामध्ये ग्रामपंचायत निवसर, गोविळ, कोल्हेवाडी, वाघ्रट, तळवडे, कोचरी, इसवली, कुर्णे, आडवली, पन्हळे , पालू, बेनी खुर्द, माजळ, शिरवली, सालपे, हर्चे, वाघणगाव, कुरंग, कोलधे, वाकेड. त्याचप्रमाणे सर्वसाधारण स्रीसाठी देखील २० ग्रामपंचायतीचे आरक्षण आहे. यामध्ये कोंडगे, वेरवली खुर्द, साटवली, पुनस, खानवली, भडे, वेरवली बुद्रुक, प्रभानवल्ली, विलवडे, वाडगाव, उपळे, कणगवली, कोट, खावडी ,भांबेड, विवली, आंजनारी, खोरनिनको, देवधे, बेनी बुद्रुक या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री साठी ८ ग्रामपंचायती आरक्षित झाल्या आहेत. या ग्रामपंचायतींमध्ये गवाणे, आसगे, इंदवटी, कोंडये, गोळवशी, रुण , वनगुळे आणि व्हेळ या ग्रामपंचायतींचा समावेश आहे .नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ८ ग्रामपंचायतींचे आरक्षण काढण्यात आले. यामध्ये वेरळ, झापडे, आगवे, कुरचुंब, कोर्ले, रावारी, रिंगणे, हर्दखळे. अनुसूचित जातीसाठी आरगाव आणि मठ या दोन ग्रामपंचायती तर अनुसूचित जाती स्त्री साठी जावडे आणि शिपोशी या दोन ग्रामपंचायतीचे आरक्षण ठेवण्यात आले आहे.