लांजा:- रत्नागिरी जिल्ह्यात अवैध दारू वाहतुकीबाबत धडक कारवाई करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क लांजा विभागाने मोठी कारवाई करत तालुक्यातील कोर्ले येथे २४ लाखांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा मुद्देमाल जप्त केला आहे.
गोव्याहून मुंबईच्या दिशेने मद्याची अवैध वाहतूक करणाऱ्या टेम्पोला सापळा रचून पकडण्यात राज्य उत्पादन शुल्क लांजाच्या पथकाला यश आले. ही कारवाई आज बुधवार २६ एप्रिल रोजी करण्यात आली. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ अ, ई, ८१, ९० व १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.