रत्नागिरी:- तालुक्यातील गणेशगुळे येथे लग्नाची पत्रिका वाटत असताना पाय घसरुन विहिरीत पडलेल्या प्रौढाचा मृत्यू झाला. याबाबत पूर्णगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून ही घटना गुरुवार 4 मे रोजी दुपारीच्या सुमारास घडली आहे.
जगन रामचंद्र म्हादये (50, रा.कुर्धे खोतवाडी, रत्नागिरी) असे विहिरीत पडून मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. जगन म्हादये हे खबर देणार्या सोबत त्याच्या लग्नाची पत्रिका वाटण्यासाठी गणेशगुळे येथील जितेंद्र तोडणकर यांच्याकडे पाय वाटेने जात होते. त्यावेळी त्यांचा पाय घसरुन ते विहिरीत पडले. खबर देणार यांनी तेथील स्थानिकांच्या मदतीने जगन म्हादये यांना विहिरीतून बाहेर काढले. त्यांना प्रथम पावस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेउन अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकिय अधिकार्यांनी जगन म्हादये यांना मृत घोषित केले.