रत्नागिरी:- शहरातील कुवारबाव रेल्वे स्टेशन येथे प्रवासी रिक्षा लावल्याच्या रागातून तरुणाला तेथील इतर रिक्षा चालकांनी मारहाण केली. मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहर पोलिस ठाण्यात मारहाण करणाऱ्या संशयित पाच जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होती.
प्रणव प्रदीप साळुंखे (वय 24, रा. रेल्वेस्टेशन, रत्नागिरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. 11) दुपारी एकच्या सुमारास रेल्वेस्टेशन येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार प्रणव साळुखे यांनी आपली रिक्षा (क्र. एमएच-08 एन 6062) घेऊन रेल्वेस्टेशन येथे गेले होते. त्याठिकाणी त्यांनी रिक्षा थांबवली असता. तेथे असलेल्या रिक्षा चालक संशयित बापल वाडकर, हरिष भैय्या, राजेश पाडावे, सचीन खेत्री, रुपेश चव्हाण यांनी इथे रिक्षा लाऊ नकोस, इथून सिट भरुन घेऊन जाऊ नकोस अशी दमदाटी करुन मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत प्रणव जखमी झाला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली असून शहर पोलिस ठाण्यात पाच संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशीरा पर्यत सुरु होती. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.