रेल्वे स्टेशन फाटा येथे एसटी-दुचाकी धडकेत तरुण जखमी

रत्नागिरी:- रत्नागिरी रेल्वे स्टेशन फाटा येथे एसटी बस च दुचाकीमध्ये झालेल्या धडकेत दुचाकीवरील तरुण जखमी झाला, ही घटना गुरूवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली, अपघातात जखमी झालेल्या सचिन मधुकर वाडकर (३९, रा. गयाळवाडी रत्नागिरी) या तरुणाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. तसेच या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिसांत. करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ४ जुलै रोजी एसटी बस (एमएच १४ बीटी २५३५) ही देवरुख ते रत्नागिरी अशी येत होती. तर सचिन हा आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच ०८ एपी १३०८) घेऊन रत्नागिरी रेल्वेस्टेशन फाटा येथून जात होता. सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्टेशन फाटा येथील कॉक्रिटच्या रस्त्यावर दुचाकीची एसटी बसला जोराची धडक बसली. या अपघातात सचिन याला दुखापत झाली. तसेच दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.