रत्नागिरी:- रत्नागिरी रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमधून अज्ञाताने दुचाकी लांबल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवार 25 जुलै रोजी सकाळी 11 ते शुक्रवार 26 जुलै रोजी दुपारी 2 वा.कालावधीत घडली आहे.
याबाबत श्रीकृष्ण पांडूरंग होतेकर (38,रा. नाचणेरोड पावर हाउस मागे,रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, श्रीकृष्ण होतेकर यांनी आपल्या मालकीची होंडा शाईन दुचाकी (एमएच -08-एएफ- 2296) रत्नागिरी रेल्वेस्टेशनच्या पार्किंगमध्ये पार्क करुन ठेवलेली होती. वरील कालावधीत ती अज्ञाताने लांबवली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 303 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.