रत्नागिरी:- रेल्वे प्रवासादरम्यान महिलेची पर्स लांबवणार्या संशयिताला शहर पोलिसांनी अटक केली. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली. शत्रूघ्न नवल शर्मा (३७, मुळ रा. बिहार सध्या रा. मुंबई) असे पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. ही घटना २७ ऑगस्ट २०२३ घडली होती.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोनिकाबेन निरजकुमार अशोककुमार शर्मा (३६, रा.गुजरात) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रारनुसार २७ ऑगस्टला त्या मडगाव ते अहमदाबाद असा कोचीवली पोरबंदर एक्सप्रेसने प्रवास करत होत्या. प्रवासात त्यांनी आपली पर्स डोक्याखाली घेउन झोपी गेल्या होत्या. मध्यरात्री ३ ते सकाळी पावणे आठ या कालावधीत त्यांची रेल्वे रत्नागिरी रेल्वेस्टेशनवर आली असताना अज्ञाताने त्यां पर्स लांबवली. सकाळी त्यांना जाग आली असता डोक्याखालील पर्स चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. पर्समध्ये २७ हजार रुपयांचा मोबाईल, रोख ४ हजार रुपये, चांदीचे पैंजण, घड्याळ असा एकूण ४४ हजार रुपयांचा ऐवज होता. याप्रकरणी तपास करताना शहर पोलिसांच्या पथकाने संशयित शत्रुघ्नला अटक केली. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.