रेल्वेने प्रवास करणाऱ्या मालवणातील वृद्ध महिलेचा मृत्यू

रत्नागिरी:- देऊळवाडा-मालवण (जि. सिंधुदुर्ग) येथील वृद्ध महिला कोकण रेल्वेच्या कोकणकन्या एक्स्प्रेसमधून प्रवास करत होती. अचानक तिच्या छातीत दुखू लागले. उपचारासाठी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. प्रज्ञा प्रदिप नाईक (वय ६४, रा. सुवर्णकुटी चाळ, लुईसवाडी, साईनाथनगर, वागळे इस्टेट ठाणे, मुळ ः देऊळवाडा, मालवण, जि. सिंधुदुर्ग) असे मृत वृद्ध महिलेचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. ७) मध्य रात्रीच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रज्ञा नाईक या रविवारी (ता. ६) ला मालवण देऊळवाडा येथून ठाणे येथे जाण्यासाठी निघाल्या होत्या कुडाळ रेल्वे स्टेशन येथे कोकण कन्या एक्स्प्रेसमधून प्रवास करत असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले त्या सीटवर बेशुद्ध पडल्या. त्यावेळी रेल्वे टिसीला कळवून रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे गाडीतून उतरवून रुग्णवाहिकेने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.