रेल्वेत चोऱ्या करणाऱ्या अट्टल चोरट्याला बेड्या

रत्नागिरी:- रेल्वेमध्ये प्रवाशांच्या सोन्याचे दागिने व इतर मौल्यवान वस्तु चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्याबाबत खेड पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल झालेले होते. सदर गुन्हा उघडकीस आणणेबाबत डॉ. मोहित कुमार गर्ग , पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहा पोलीस निरीक्षक प्रविण स्वामी यांचे नेतृत्वाखाली पोलीस पथक नेमले होते आणि त्यांना सदर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन केले होते .

त्यानुसार सदर पथकाने गोपनिय माहितगार तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन वर नमूद गुन्ह्यात सहभागी असलेला सुखविर ऊर्फ अजय हरदम सिंग (रा . बिलौटी , राजस्थान} यास चिपळुण रेल्वे स्टेशन परिसरातुन ताब्यात घेतले . त्याचेकडे केलेल्या चौकशीत त्याने वरील गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्यास खेड पोलीस ठाण्याच्या ताब्यात पुढील तपासकामी देण्यात आले. सदर आरोपीस दि . २६ जुलै रोजी न्यायालयासमोर हजर केले असता त्यास दि . २८ जुलै रोजी पर्यत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे .

या चोरीच्या गुन्ह्याचा तपास सपोनि सुजित गडदे हे करीत आहेत . सदरची कामगिरीत सपोनि प्रविण स्वामी यांचे सहित पोहवा विजय आंबेकर , सागर साळवी , पोना . योगेश नार्वेकर , दत्तात्रय कांबळे तसेच चिपळुण पोलीस ठाणे , रत्नागिरी शहर पोलीस ठाणे , रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणेकडील अंमलदारांनी सहभाग घेतला .