रुग्णसंख्या वाढतीच; जिल्ह्यात नव्याने 88 पॉझिटिव्ह रुग्ण 

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच असल्याचे चित्र आहे. नव्याने आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. 24 तासात 1 हजार 395 अहवालांमध्ये तब्बल 88 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 24 तासात एकाही रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला नसून जिल्ह्यात सद्यस्थितीत 369 पॉझिटिव्ह रुग्ण उपचारखाली आहेत. 

जिल्ह्यात 24 तासात 34 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यँत 76 हजार 721 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण  96.40 टक्के आहे. नव्याने 88 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 79 हजार 582 इतकी झाली आहे. 

 जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 492 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.1 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलीगिकरणात 277 तर संस्थात्मक विलीगिकरणात 92 रुग्ण उपचार घेत आहेत.