रुग्णसंख्या पुन्हा वाढली; जिल्ह्यात 24 तासात कोरोनाचे 662 नवे रुग्ण

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दररोज वाढ होत आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात 662 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यातील तब्बल 436 रुग्ण हे आरटीपीसीआर चाचणी केलेले आहेत. तर 226 रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत. नवे 662 रुग्ण सापडल्याने जिल्ह्याची रुग्णसंख्या 25 हजार 901 झाली आहे. जिल्ह्यात आज 796 जण कोरोनामुक्त झाले आहेत तर 19 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात गुरुवारी 390 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. सोमवार वगळता अन्य दिवशी रुग्णसंख्येत झालेली ही मोठी घट होती. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील दिलासा मिळाला होता. मात्र हा दिलासा काही तासंचाच ठरला. नव्याने आलेल्या 662 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 436 रुग्ण आरटीपीसीआर तर 226 रुग्ण अँटीजेन चाचणीत बाधित सापडले आहेत.  जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 25 हजार 901 जाऊन पोहचली आहे. 

मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने तब्बल 19 रुग्णांचा बळी गेला असूूून जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 773 इतकी आहे. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 6 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण 2.98 % आहे. जिल्ह्यातील कोरोनामुळे वाढणारा मृत्यूदर चिंताजनक आहे. जिल्ह्यात आज 796 जण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत एकूण 19190 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 74.08% आहे.मागील चोवीस तासात 1044 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले असून आतापर्यंत एकूण 1,34,217 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.