रत्नागिरी:- दररोज होणारी पेट्रोल, गॅस दरवाढ, परिवहन विभागाच्या विविध शुल्कामध्ये होणारी भरमसाठ वाढ, १५ वर्षे झालेल्या रिक्षांना आकराला जाणारा दंड, पासिंगवेळी लादल्या जाणाऱ्या जाचक अटी, आदी मागण्या आरटीओंकडून गांभीर्याने घेतल्या जात नाही. त्याविरोधात जिल्ह्यातील सर्व रिक्षा संघटना व विविध संघटना आज बुधवारी आपली कैफियत मांडण्यासाठी आरटीओ कार्यालयावर धडकणार आहेत. रत्नदुर्ग रिक्षा संघटनेचे अध्यक्ष प्रताप भाटकर यांनी ही माहिती दिली.
चलो रत्नागिरी… चलो रत्नागिरी…चा नारा देत हे रिक्षा व्यवसायिक उद्या येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयावर आपल्या मागण्यांसाठी धडकणार आहेत. पेट्रोल/गॅस दरवढ, परिवहन विभागाच्या विविध शुल्कामध्ये झालेली भरमसाठ वाढ, आदी विषयांसाठी यापूर्वी रिक्षा संघटनांनी निवेदनाद्वारे आपले म्हणणे आरटीओंकडे माडले होते. परतु त्याकडे गांभार्याने लक्ष देण्यात आले नसल्याचे मत रिक्षा व्यवसायिकाचे आहे. याचा जाब विचारण्यासाठी पुन्हा एकदा जिल्ह्यातील रिक्षा संघटना एकत्र येणार आहेत. बुधवारी दुपारी अडीच वाजता आरटीओंना भेटून याचा जाब विचारणार आहेत.