चिपळूण:- राष्ट्रवादीचे चिपळूणमधील आमदार शेखर निकम यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली.
फेसबुक पोस्ट करताना त्यांनी माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही पण माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी,ही नम्र विनंती काळजी घ्या. असा मजकूर टाकताना कार्यालयीन कामकाजाकरिता संपर्क कार्यालयात संपर्क करावा असेही नमूद केले आहे.