राम जन्मला ग सखे राम जन्मला… रत्नागिरीत राम जन्मोत्सव उत्साहात साजरा

रत्नागिरी:- रत्नागिरीत रविवारी रामनवमीचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. रत्नागिरी शहरातील राम आळीतील प्रभू श्री राम मंदिरात राम जन्मोत्सव सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. प्रभू श्री रामचंद्रांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर हा दुमदुमून गेला होता.

शहरातील राम मंदिरासह इतर राममंदिरांमध्ये रविवारी सकाळपासून भाविकांनी मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी गर्दी केली होती. तसेच रामनवमीच्या निमित्ताने होणाऱ्या विविध कार्यक्रमांची देखील जय्यत तयारी सुरू होती. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या वेशभूषांमध्ये तरुण, लहान मुले पाहायला मिळाले.

रविवारी दूपारी १२ वाजेच्या सुमारास भक्तिमय आणि उत्साहाच्या वातावरणात शहरातील राममंदिरामध्ये रामजन्मोत्सव सोहळा साजरा झाला. यावेळी राम सीता जय सीताच्या घोषणांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.