खेड:- तालुक्यातील बोरघर येथील जंगलमय भागात रानडुक्कराची शिकार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अजित नारायण कदम (रा. बोरघर-घोलपवाडी), आकाश बाळकृष्ण पवार (रा. बोरघर-आदिवासीवाडी) या दोघांचीही प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जामिनावर सुटका करण्यात आली.
संशयितांच्या वतीने ॲड. पुनम जाधव यांनी काम पाहिले. बोरघर येथील रानडुक्कराच्या शिकारप्रकरणी दोघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. याशिवाय दर सोमवारी वनविभागाच्या कार्यालयात हजेरी लावून पुढील चौकशीसाठी सहकार्य करण्याची अट घालण्यात आली आहे. शिकार प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग होता का, याचा वनविभागाच्या पथकाकडून तपास करण्यात येत आहे.