राज ठाकरे यांच्या सभेसाठी रत्नागिरीला येत असताना अपघातात मनसेच्या उपशाखाप्रमुखाचा मृत्यू

संगमेश्वर:- रत्नागिरीत आज होणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभेला मुंबईहुन रत्नागिरीला जाणाऱ्या इनोवा गाडीला तुरळ जवळ झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर पाच जण जखमी झाले आहेत

याबाबत संगमेश्वर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनसे प्रमुख राज ठाकरे यांची आज रत्नागिरीत जाहीर सभा होत आहे. या सभेसाठी राज्यातील विविध भागातून हजारो कार्यकर्ते रत्नागिरीत दाखल झाले आहेत. यापैकीच मुंबईहुन इनोवा कारने  (एमएच 43 व्ही 9201)  देवेंद्र जगन्नाथ साळवी (वय 42) हे 5 सहका-यांसह रत्नागिरीत येत असतांना तुरळ येथील सद्गुरू सेवा केंद्राजवळ चालकाचा  कारवरील ताबा सुटला आणि अपघात झाला. 

जखमी अवस्थेत देवेंद्र यांना रुग्णालयात नेत असतांनाच रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. गाडीतील सहप्रवाशांना किरकोळ जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

देवेंद्र साळवी हा मुंबईतील मनसेचा सक्रिय कार्यकर्ता होते. मनसेच्या उपशाखाप्रमुखपदावर कार्यरत होते. त्याच्या निधनाची बातमी समजताच मनसे नेते नितीन सरदेसाई; बाळा नांदगावकर आदीनी रुग्णालयात धाव घेतली. या निधनामुळे मनसैनिकात शोककळा पसरली आहे.