राज्य उत्पादन शुल्क लवकरच उभारणार भव्य इमारत

२० कोटींचे अंदाजपत्रक; राज्य शासनाच्या मंजूरीची प्रतिक्षा

रत्नागिरी:- राज्याला सर्वाधिक महसूल देणार्या राज्य उत्पादन शुल्क  विभाग आजही ब्रिटीशकालीन जुन्या इमारतीतून जिल्ह्याचा कारभार हाकत आहे. मात्र आता राज्य उत्पादन शुल्क विभाग लवकरच अलिशान चार मजली इमारतीत जाणार आहे. इमारतीचे सुमारे २० कोटी रु.चे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. शासनाची अंतिम मंजूरी मिळाल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे. 

सन १८७८ मध्ये उत्पादन शुल्क विभागाच्या स्थापनेपासून आतापर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभाग ब्रिटशकालीन जून्या इमारतीत आहे. राज्याच्या महसूल उत्पन्नामध्ये महत्त्वाचे योगदान देणार्या या विभागाच्या सुसज्ज इमारत नसल्याने अधिकार्यांना बसण्यासाठी ही पुरेशी जागा उपलब्ध नव्हती. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी असलेल्या जागेचा पूरेपूर वापर करुन काम करत आहेत. 

काहि वर्षांपुर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इमारतीचे १२ कोटींचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. परंतु कोविड‚१९ लाटेमुळे निधीला  विलंब झाला आणि त्यामुळे सध्याचे अंदाजपत्रक वाढून एकूण बांधकाम खर्च २० कोटींपर्यंत गेला आहे.

नव्या इमारतीत अधिकारी आणि कर्मचारी यांची कार्यालये असणार आहेत. याशिवाय  चार भरारी पथके, कार्यालयनी कर्मचारी यांच्यासाठी स्वतंत्र विभाग अशी चार मजली इमारतीची रचना असाणार आहे. राज्य सरकारने निधीला मंजूरी दिल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे.