रत्नागिरी:- शहरातील राजीवडा येथे अज्ञात कारणातून भावाला बहिणीने आणि तिच्या मुलांनी शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना बुधवार, २६ एप्रिल रोजी दुपारी १.३० ते १.४५ वा. कालावधीत घडली आहे. याबाबत फिर्यादी भावाने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
त्यानुसार, बुधवारी दुपारी ते राजीवडा नाका येथील आपल्या बहिणीच्या घरी आपले साहित्य आणण्यासाठी गेले होते. तेव्हा बहिणीच्या तीन मुलांनी फिर्यादीच्या अंगावर जाऊन शिवीगाळ केली. त्यानंतर बहिणीने फिर्यादीला लाकडी दांडक्याने डोक्यावर, उजव्या पायावर मारून दुखापत केली. त्यातील एका मुलाने फिर्यादीच्या पाठीवर छोट्या ब्लेडने वार करत हातांच्या थापटांनी मारहाण केली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तीन संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.