राजीवडा येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण; गुन्हा दाखल

रत्नागिरी:- शहरातील राजिवडा झोपडपट्टी येथे राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचे अपहरण होऊन तब्बल २५ दिवस उलटून गेले आहेत. या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी काल म्हणजे २८ नोव्हेंबर रोजी शहर पोलीस स्थानकात दिली आहे.

अपहारीत मुलगी हि अल्पवयीन असून फैजान युसुफ सुवर्णदुर्गकर(राजीवडा, रत्नागिरी) हा अपहरण करणारा तरुण २० वर्षाचा आहे. या तरुणाने काही महिन्यांपूर्वी देखील या तरुणीचे अपहरण केले होते. त्यावेळी देखील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हि तरुणी अत्यंत गरीब घरातील असल्याने २ नोव्हेंबर रोजी अपहरण होऊनही हा तरुण आपल्या मुलीला परत आणून देईल या आशेने तिच्या वडिलांनी इतके दिवस पोलिसात तक्रार केली नव्हती. एकच आरोपी काही महिन्यांच्या अंतराने पुन्हा त्याच अल्पवयीन मुलीचे अपहरण करतो हि खरोखरच एक धक्कादायक बाब आहे. पुन्हा या आरोपीला पकडण्यासाठी व त्या अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यासाठी पोलिसांनी तपास चालू केला असून याबाबत पोलीस उप निरीक्षक महाले अधिक तपास करीत आहेत.