रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यात रविवारी पाच नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडून आले. सापडलेल्या पाच रुग्णांपैकी दोन रुग्ण राजीवडा येथील आहेत.
रविवारी रात्री आलेल्या अहवालानुसार रत्नागिरी तालुक्यात पाच नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. या पाच रुग्णांमध्ये दोन राजीवडा येथील रुग्ण आहेत. एक गुडेवठार तर एक गावडेआंबेरे येथील रुग्ण आहे. कोतवडे येथे एक रुग्ण सापडला असून हा रुग्ण रत्नागिरीतील एका खाजगी रुग्णालयात नर्स म्हणून काम करत होता. कोव्हिड रुग्णालयात स्वॅब घेतल्यानंतर या नर्सचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
दरम्यान राजीवडा येथील एका कोरोना बाधित रुग्णाला उपचारासाठी कोव्हिड रुग्णालयात दाखल करण्यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी गेले असता या कर्मचाऱ्यांसोबत येथील नागरिकांनी हुज्जत घातली. रुग्णाला उपचारासाठी दाखल करण्यावरून रविवारी रात्री मोठा तणाव निर्माण झाला होता. अखेर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनि पोलीस यंत्रणेला पाचारण केले. नागरिकांची समजूत काढून संबंधीत रुग्णाला उपचारासाठी दाखल करण्यात आले.