रत्नागिरी:- शहरातील राजीवडा खाडी येथे मच्छिमारी बोटीवरुन समुद्राच्या पाण्यात पडून खलाशी बेपत्ता झाल्याची घटना मंगळवार 16 जानेवारी रोजी दुपारी 1 वा.सुमारास घडली.
ही घटना घडल्यानंतर भाट्ये पुलावर नागरिकांनी एकच गर्दी केली होती. त्यामुळे भाट्ये पुलावरुनच अज्ञाताने खाडीत उडी मारुन आत्महत्या केली असल्याची चर्चा सर्वत्र पसरली होती. परंतू राजीवडा खाडीत मच्छिमारी करणार्या बोटीवरुनच खलाशी खाडीच्या पाण्यात पडून बेपत्ता झाला होता. याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात त्या खलाशाची बेपत्ता झाल्याची नोंद करण्याची कार्यवाही सुरु होती.