राजिवड्यात चक्क समुद्रात अनधिकृत बांधकाम

नौकांचा मार्ग बंद; स्थानिक मच्छिमारांची मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार

रत्नागिरी:- शहरातील राजिवडा येथे चक्क समुद्रातच आब्बास मोहम्मद वस्ता यांनी अनधिकृत बांधकाम सुरु केले आहे. त्यामुळे इतर नौका चालकांचा नौका किनाऱ्यावर येण्याचा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे आब्बास वस्ता यांचे अनधिकृत बांधकाम तात्काळ थांबवून ते तोडून टाकावे अशी मागणी नौका मालकांनी पालिका मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. मात्र समुद्रात बांधकाम करणाऱ्या वस्ता यांच्यावर पालिका काय करवाई करणार याकडे नौका मालकांचे लक्ष लागले आहे.

राजिवडा येथे राहणारे आब्बास मोहम्मद वस्ता यांनी नौका  किनार्‍यावर येणाऱ्या मार्गावर चक्क समुद्रातच पक्के बांधकाम सुरु  केले आहे. पुलाच्या बांधकामासारखे पाण्यात पिलर उभारुन बांधकाम केले जात आहे. समुद्रात बांधकाम सुरु करण्यात आल्याने किनार्‍यावर येणार्‍या नौकांचा मार्ग बंद झाला आहे. राजिवाडा हा मच्छिमारांचा गाव आहे. येथे सर्वजण मच्छि व्यावायिक आहेत. त्यामुळे सर्व मच्छिमारांना नौका किनार्‍यावर आणणे अश्यक्य होणार आहे.

सर्व नौका धारक तसेच मासे व्यापारी यांनी आब्बास वस्ता यांना, असे अनधिकृत बांधकाम करू नका त्यामुळे आमचे नुकसान होणार आहे. परंतू वस्ता यांनी आमचे न जुमानता आपली मनमानी करून त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरू केले आहे. तरी वस्तुस्थितीची पहाणी करून संबंधित व्यक्तीला अशाप्रकारचे अनधिकृत बांधकाम करण्यास रोखावे व त्यांना आपलेकडून योग्य ती समज देण्यात यावी व त्यांनी सुरु केलेले अनधिकृत बांधकाम काढून टाकणेचा आदेश द्यावा व आमची जशी पहिली बोट लावण्यासाठी जशी वाट होती तशी ठेवण्यास सांगावी अशी मागणी फकिर मोहम्मद वस्ता व इतर सर्व नौका मालक व मासे व्यापारी यांनी  पालिका मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.