तरुण जखमी ; दोघांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- मोबाईल हरवला यांची तक्रार देऊन परतणाऱ्या तरुणाला दोघांनी शिवीगाळ व लोखंडी रॉडने मारहाण करुन जखमी केले. शहर पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हुसेन आणि सलमान अशी संशयितांची नावे आहेत (पुर्ण नाव पत्ता माहिती नाही) ही घटना मंगळवारी (ता. ९) दुपारी दोन च्या सुमारास शहरातील धनजीनाका येथील गल्लीतील रस्त्यावर घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी मोहसीन नुरमहम्मद फणसोपकर (वय ३९, रा. राजिवडा नाका, रत्नागिरी) हे त्यांच्या मोबाईल हरवला म्हणून शहर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यासाठी गेले होते. अर्ज दिल्यानंतर अर्जामध्ये मॉडेल नंबर बरोबर लिहिला आहे की नाही ती खात्री करण्यासाठी मंगळवारी दुपारी पुन्हा पोलिस ठाण्यात गेले होते. खात्री करुन परतत असताना धनजीनाका गल्लीतील रस्त्यावर आले असता संशयित हुसेन याने तु कुठचा आहेस अशी विचारणा केली. त्यावेळी मी राजिवडा येथे राहणार आहे. असे सांगितले त्यावेळी हुसेन याने तुम्ही राजिवडा येथील लोक पुढे आले असे बोलून
त्याचा मित्र सलमान यास हाक मारुन दांडका आण रे असे सांगितले. संशयित हुसेन याने फणसोपकर यांची कॉलर पकडून ठेवले होते. सलमान याने लोखंडी रॉड आणल्यानंतर हुसेन याने मोहसीन फणसोपकर यांच्या डाव्या पायावर व दोन्ही मांडीवर मारहाण करुन जखमी केले. या प्रकरणी मोहसीन फणसोपकर याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.