राजापूर:- राजापूर मधील हातिवले कोंडये येथे एक अनोखे दुर्मिळ पीसोरी हरण आढळले आहे. हे हरण सर्व जातीच्या हरणांमध्ये सर्वात लहान दिसून येते. डोके लहान, तर नगपुडया उंदरासारख्या टोकदार असणाऱ्या या हरणाला माऊस डियर असेही म्हणतात.
पिसुरी हरण यालाच पिसोरी सुद्धा म्हणतात. आशियाई पिसूरी हरण व आफ्रिका पीसुरी हरण या दोन विशिष्ट जाती आहेत. यातील आशियाई पिसुरी हरणाची एक उपजात भारतात आढळते. त्यामुळेच हे हरीण भारतात दुर्मिळ आहे. हे हरण खूपच भित्रे असते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
जैतापूर मधील अणसुरे गावचे ग्रामस्थ राकेश कणेरी या सकाळी कामानिमित्त बाहेर चालले होते. यावेळी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास महामार्गावरून जात असताना कोंडये दरम्यान त्यांना हे पिसोरी हरण घाबरलेल्या स्थितीत दिसून आले. कणेरी यांनी याबाबतची माहिती शेजारी असलेल्या लोकांना दिली. लोकांनी ही सहकार्याची भावना दाखवून त्या हरणाला पकडण्यात आले. त्यानंतर हरणाला जंगलात सोडण्यात आले. पिसोरी हरणाला जीवनदान दिल्याने कणेरी यांच्यासह ग्रामस्थांचे कौतुक होत आहे.