राजापूर:- मुंबई – गोवा महामार्गावर कोदवली विज उपकेंद्राच्या समोर मालवाहू कंटेनर आणि अल्टो कार यांच्यात समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात अल्टो कार चालक दिलीप भिकलिंग जंगम (६५) रा. कुडाळ विठ्ठलवाडी हे जागीच ठार झाले आहेत. तर त्यांच्या पत्नी सौ. दिपाली दिलीप जंगम (५४) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरीत हलविण्यात आले आहे.
शुक्रवारी सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला. अल्टो कार चालक दिलीप जंगम हे मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जात असताना ते राजापूर कोदवली विज उपकेंद्रानजीक आले असता महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला ओव्हरेटक करत ते निघाले असता समोरून गोव्याकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरवर ते आदळले. यात ते जागीच ठार झाले तर पत्नी गंभीर जखमी झाली.