राजापूर:- चिरेखाण येथील स्पीड ब्रेकर हटवल्यामुळे अपघात होऊ लागले आहेत. शुकवारी (ता. २६) सायंकाळी एका चारचाकी गाडीने धडक दिल्यामुळे गायीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला.
राजापूर तालुक्यातील चिरेखाण आणि कोंबे स्टॉप येथील रस्त्यावर घालण्यात आलेले स्पीड ब्रेकर उंच आहेत. ते अपघाताला कारणीभूत ठरत होते. त्यामुळे वाहनचालकांच्या मागणीनुसार स्पीडब्रेकर हटविले होते. ते हटविल्यानंतर वाहन चालक या मार्गावरून वेगात वाहने हाकत आहेत. गुरूवारी सांयकाळी एका भरधाव चारचाकी गाडीने गायीला जोरदार धडक दिली. या अपघातात गायीचा जागीच मृत्यू झाला. जर स्पीडब्रेकर असता तर हा अपघात झाला नसता अशी चर्चा स्थानिकांकडून केली जात आहे. शासनाने तातडीने स्पीडब्रेकर घालावे, अशी मागणी स्थानिकांनकडून होत आहे.