वाटूळ:- राजापूर तालुक्यातील ओणी कासारवाडी स्मशानभूमीजवळील वळणावर बोलेरो पिकअप गाडीला झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी तर काही महिलांना गंभीर दुखापत झाली. राजापूर – वडदहसोळ गीतेवाडीतील रिक्षाचालक अरुण गीतयेंच्या मुलीचा ३ दिवसांपूर्वी विवाह संपन्न झाला होता. शिरवलीत पूजा असल्याने कुटुंबातील महिलांना घेऊन असताना हा अपघात झाला.
गाडी ओणी कासारवाडी स्मशानभूमीजवळील वळणावर आली असता चालक कुणाल गीतयेचा गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्याच्या ताब्यातील बोलेरो पिकअप गटारात जात एका झाडाला आदळली. चालकासह एकूण १८ माणसे होती. त्यात सर्व महिलांचा समावेश होता. यात चालकाला गंभीर दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविले आहे. त्यातील काही महिलांना गंभीर दुखापत झाली. त्या रत्नागिरीतील सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार घेत आहेत.