रत्नागिरी:- राजापूर तालुक्यातील कोदवली तरळवाडी येथे बेकायदेशीर काडतुसाने भरलेली बंदूक गोठयात ठेवल्या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. ही घटना 6 फेब्रुवारी रोजी रात्री 8.30 वा. च्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजापूर तालुक्यातील कोदवली तळवाडी येथे काडतुसाने भरलेली बंदूक एकाने बाळगल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी जाऊ न घराची झाडाझडती घेतली. मात्र घरात काहीच आढळून आले नाही. त्यानंतर पोलिसांनी घराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या गोठ्याची झाडाझडती घेतली असता तेथे सिलबंद बंदूक आढळून आली. यामध्ये 10 हजार रुपयांची सिंगल बॅरल काडतुसाची बंदूक तसेच 2 हजार 700 रुपयांची 9 काडतुसांनी भरलेली सिलबंद बाराबोअरची शक्तीमान एक्सप्रेस कंपनीची बंदूक असा एकूण 12 हजार 700 रुपयांच्या बंदुकीच्या मालसह एकाला ताब्यात घेतले.
अरविंद अनु मांडवे (45, कोदवली, तरळवाडी, राजापूर) असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबतची फिर्याद पोलीस नाईक सचिन काशिराम वीर यांनी पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.