राजापूरकर कॉलनी येथील महिलेचा फिनेल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

रत्नागिरी:-  शहरातील राजापूरकर कॉलनी येथील महिलेने बुधवारी सकाळी ९.३० वा. सुमारास अज्ञात कारणातून राहत्या घरी फिनेल प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सीमा जहर खतीब (३९, रा. राजापूरकर कॉलनी, रत्नागिरी) असे फिनेल प्राशन केलेल्या महिलेचे नाव आहे.

बुधवारी सकाळी तिने राहत्या घरी फिनेल प्राशन केल्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागले. ही बाब तिच्या नातेवाईकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.