राजापुरात चहाच्या टपरीवरील कामगाराला बेदम मारहाण 

सीसीटिव्हीचा डीव्हीआर देखील चोरला, रोख रक्कम चोरली 

राजापूर:- राजापूर तालुक्यातील हातीवले येथे चहाचा व्यवसाय चांगल्या प्रकारे चालतो याचा राग मनात धरून 10 ते 15 जणांनी टपरीवरील कामगाराला मारहाण केल्याची घटना घडली आहे. 27ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली हा प्रकार घडला.

 याबाबतची फिर्याद सुनीलकुमार यादव (30, हातीवले, टोलनाका राजापूर, मुळ उत्तरप्रदेश) याने पोलिस स्थानकात दिली आहे. त्यानुसार किरण कुमार मनचेकर (46, हातिवले, राजापूर ) यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनीलकुमार यादव हा हातिवले टोलनाक्याजवळ भैरवदीन यादव यांच्या मालकीच्या फर्निचर, वर्क शॉप तसेच चहाची टपरी अशा ठिकाणी काम करतो. त्याचा चहाचा व्यवसाय उत्तम चालतो. त्याच्या व्यवसायाचा परिणाम रामचंद्र मनचेकर यांच्या जनरल स्टोअर्स आणि स्नॅक्स वर होतो याचा राग धरून मनचेकर यांनी 10-15 जणांना सोबत घेऊन सुनीलकुमार यादव याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच ठार मारण्याची धमकी दिली. मारहाण केल्यानंतर दुकानातील सीसीटिव्हीचा डिआरची चोरी करत गळ्यातील चेन आणि पँटच्या खिशातील 8500 रुपये चोरून नेले.