पाचल:- तालुक्यातील कारवली अर्जुना माध्यमिक विद्यालयासमोर टाटा इंडिका व्हिस्टा कारने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना 3 जानेवारी रोजी 3.30 वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. स्वामी दिनेश वाझे (23, कारवली, राजापूर) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वामी वाझे हा आपल्या ताब्यातील दुचाकी (एम एम 08- ए झेड- 4897) घेऊन कारवली ते पाचल असा चालला होता. यावेळी कारवली अर्जुना माध्यमिक विद्यालयासमोर टाटा इंडिका व्हिस्टा कार (एम एच 09 सी एम 3597 ) गाडीने स्वामीच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात स्वामी हा रस्त्यावर पडून त्याच्या डोक्याला, पाहायला दुखापती झाल्या. तसेच गाडीचे दर्शनी भागाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. चारचाकी चालक निलेश गणपत शिंदे (30, राजाराम पुरी कोल्हापूर) याने आपल्या ताब्यातील चारचाकी बेदरकारपणे चालवून स्वामी यांच्या दुखापतीस व दुचाकीच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघाताचा तपास राजापूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल अनंत तीवरेकर करत आहेत.