राजन साळवींना कबड्डी कबड्डी करून आपटणार: भास्कर जाधव

रत्नागिरी:- माजी आमदार राजन साळवी यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश का झाला नाही, तिथे विरोध कोणी केला हा प्रश्न आहे. पण आता मात्र शिवसेना पक्षप्रवेशावेळी सामंत बंधूनी त्यांचं स्वागत केलं असेल तर मला माहित नाही. पण आता शिवसेनेत हे स्वागत आहे की, त्यांना कबड्डी कबड्डी करून आत घेऊन त्यांना आपटायची तयारी आहे, हे येत्या काळात दिसेल असा जोरदार टोला गुहागर विधानसभा मतदारसंघो आमदार भास्कर जाधव यांनी सामंत बंधूना लगावला आहे.
राजन साळवी नेहमी मी एकमेव निष्ठावान म्हणायचे, स्वतच स्वतला एखादी बिरू दावली लावतो, सुरुवातीला लोकांना अप्रूप वाटतं. नंतर विषय चेष्टेचा होतो. हा निष्ठावान ही बिरुदावली तुम्हाला लावावी का ? हे राजन साळवींना विचारा असेही आमदार भास्कर जाधव पत्रकारांशी बोलताना म्हणाले आहेत.
उद्धव साहेबांचे लोकं फोडणं म्हणजे ‘ऑपरेशन टायगर’ म्हटलं जातेय. पण आजही एकच टायगर उद्धव बाळासाहेब ठाकरे हे विरोधकांना मान्य करावं लागतं याचा मला अभिमान असल्यो जाधव म्हणाले. जाणाऱयांनी आणि येणाऱयांनी आपण जाण्याची आणि येण्याची वेळ आपल्या दृष्टीने योग्य आहे का, याचा विचार करून आहेच त्याच ठिकाणी थांबणे योग्य आहे, असे जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आमो पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्रास दय़ायचाच हा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. जे जाताहेत त्यांना थांबविण्यासाठी पक्षप्रमुख प्रयत्न करताहेत. पण काही लोकांना वेगवेगळ्या मार्गाने आपल्याकडे वळविलं जातंय, दबाव आहे. केवळ सुडाचं राजकारण सुरू आहे, एवढं होऊनही उद्धव ठाकरे बधत नाहीत, खचले नाहीत, हात टेकले नाहीत, त्यामुळे झोप उडाली आहे, ‘अभी भी टायगर जिंदा है,’ ही भीती त्यांच्या मनात आहे.
त्यामुळे जाणाऱयांना जाऊदे असं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हणणं योग्य आहे. पण पक्षप्रमुखांची भाषा आमच्यासारख्या नेत्यांनी वापरणं योग्य नाही. नेत्यांनी ही भाषा वापरणं पक्षाच्या हिताचं नाही, असा साक टोला उबाठा पक्षातील वरिष्ठ नेत्यांना भास्कर जाधव यांनी लगावला आहे. जाणाऱयांना मागे कसं फिरवता येईल, ते हिमतीने कसे उभे राहतील अशा पद्धतीचा मंत्र देणं आवश्यक आहे. जातील त्यांना जाऊ द्या असं म्हणणं लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही.