रस्ता डांबरीकरणासाठी वाशी तर्फे संगमेश्वर ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण

रत्नागिरी:- संगमेश्वर येथील रस्ता बुरंबी ते देवशेत‚फणसवळे हा मार्ग गेल्या काही वर्षात एकदाही डांबरिकरण केलेले नाही. रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. खराब रस्त्यामुळे एसटीच्या फेर्या कमी केल्या आहेत. त्याचा आर्थिक भूर्दंड ग्रामस्थांना पडत आहे. रस्ता डांबरीकरण मंजूर होऊनही अध्याप काम सुरु करण्यात न आल्याने ग्रामस्थांनी पंकज सप्तिस्कर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण सुरु केले आहे.

संगमेश्वर तालुक्यातील वाशी तर्फे संगमेश्वर येथील रस्ता बुरंबी ते देवशेत‚फणसवळे या रस्त्यात इतके खडडे आहेत की, कित्येक नागरिकांचे अपघात होऊन त्यांचे हात‚पाय फ्रॅक्चर झालेले आहेत. त्यात एका महिलेचा अपघाती मृत्यू देखिल झालेला आहे.एसटी बसचालक अक्षरश: रस्ता खराब असल्याने एसटी फेर्या कमी करतात.

रिक्षाचालक तर ८ कि.मी. रोडला ६०० ते ९००रुपये अवाजवी भाडे आकारत आहेत. तरी आपण हा रस्ता जिल्हा परिषदेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करावा. आम्ही आपल्या संगमेश्वर येथील जिल्हा बांधकाम कार्यालयाकडे विचारले असता आमच्याकडे निधीच उपलब्ध नाही असे उत्तर मिळाले. त्यामुळे रस्त्यासाठी निधी उपलब्ध करुण देण्याची मागणी आंदोलकांनी केले आहे.