जयस्तंभ येथे पाण्याची पाईप लाईन फुटली; हजारो लिटर पाणी वाया
रत्नागिरी:- शहरातील जयस्तंभ येथे पाईप लाईन पुन्हा फुटली. फुटलेल्या पाईप लाईन मधून सकाळी साडेसहा वाजल्यापासून पाणी रस्त्यावर वाहून गेले. विशेष म्हणजे रत्नागिरी नगर परिषदेपासून अवघ्या काही पावलांवर पाणी वाया जात असताना देखील अधिकारी किंवा कर्मचारी यांनी याकडे लक्ष दिले नाही. यामुळे इतर शहरात यंत्रणा कशी राबवणार असा प्रश्नच आहे.

मागील काही दिवसापासून रत्नागिरी शहरात पाऊस लागत नसला तरी जयस्तंभ येते रस्त्याला तलावाचे स्वरूप आले आहे. याचे कारण नगर परिषदेची पाईपलाईन आहे ती पाईपलाईन दररोज सकाळी लिकेज होत आहे. त्यामुळे या भागात तलावाचे स्वरूप प्राप्त होत आहे. अनेक ठिकाणी पाणी टंचाई असताना या भागात पाणी वाया जाताना दिसत आहे.
शुक्रवारी सकाळी पुन्हा ही पाइपलाइन फुटली आणि हजारो लिटर पाणी वाया गेले.