रनपची ती निविदा स्थायी निर्देशातील सूचनेनुसारच

रत्नागिरी:– कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजना कोविड-19 च्या घातक कचरा जाळून नष्ट करणे, ही कामे रत्नागिरी नगर परिषदेने मार्गदर्शक सूचनेनुसार हाती घेतली आहेत.प्रतिबंधात्मक उपाययोजनांची निविदा नगरपरिषद प्रशासन संचालनालय स्थायी निर्देशातील सूचनेनुसार आहेत. त्याचबरोबर घातक कचरा विल्हेवाट निविदा प्रक्रिया केंद्र शासनाच्या गृह निर्माण व नागरी विकास मंत्रालयाचे संयुक्त सचिव यांच्या पत्रानुसार करण्यात आले आहे. रनपकडून मिळालेल्या या माहितीने भाजपच्या नेत्यांनी या निविदा प्रक्रिया संदर्भात केलेला चुकीच्या कार्यपद्धतीच्या आरोपाला पूर्णविराम मिळाला आहे.     

कोरोनाच्या या घातक जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी रनपला आवश्यक यंत्रणा पुरवणे आणि कोरोना प्रतिबंधक उपाय योजनेअंतर्गत पुनर्वापर करता येणारे कापडी मास्क हॅन्ड ग्लोज पुरवण्यासाठी नगरपालिकेकडून निविदा प्रक्रिया करण्यात आली ऑनलाइन होणारी ही प्रक्रिया चुकीची असल्याचा आरोप भाजपा नेत्यांनी केला आहे.निविदेत या कामांची अंदाजपत्रकीय रक्कम नमूद नसल्याने हा संशय व्यक्त करण्यात आला आहेत. त्याबाबत पालिकेकडून माहिती घेतली असता निविदा प्रक्रिया योग्य असल्याचे स्पष्ट होत आहे.

कोरोना संकट इतक्यात संपण्याची खात्री नाही. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी म्हणजेच कोरोनाविषाणू पासून दूर रहाण्यासाठी पुन्हा पुन्हा किंवा सतत मास्क व हॅन्ड ग्लोज वापरत राहावे लागणार आहे असावी पुनर्वापर करता येणारे मास व हॅन्ड ग्लोज वापरणे क्रमप्राप्त आहे .अशा परिस्थितीत 365 दिवसांसाठी दर करार करण्यात करण्याबाबत नगरपरिषद प्रशासन संचालनालय याच्या स्थायी निर्देशातील मार्गसुचना आहेत. त्यानुसार वार्षिक दर करण्याच्या निविदा मागविण्यात आल्याने अंदाज पत्रक नमूद करता येत नाही.भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण व लसीकरण कामेसुद्धा हीच पद्धत अवलंबिण्यात आले आहे. बदलत्या किंवा कमी-जास्त होणाऱ्या कामांची शासकीय दर सूची अजून उपलब्ध नाही.

कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या सान्निध्यात येणाऱ्या व्यक्तींचा कचरा हा जैविक घातक कचरा म्हणून ओळखला जातो.अशा कचऱ्याची विल्हेवाट लावावी लागते. हा जैविक कचरा जाळून नष्ट करावा लागतो कोरोणाचा धोका प्रथमच व अचानक निर्माण झालेला आहे. ही विल्हेवाट लावण्यासाठी केंद्रशासनाच्या गृहनिर्माण व नागरी विकास मंत्रालयाच्या संयुक्त सचिव आणि कार्यवाही कशी करावी याच्या पत्राद्वारे सूचना केल्या आहेत या कामासंदर्भात ही निश्चितच सूची नाही त्यामुळे सचिवांच्या पत्रानुसार कार्यवाही करण्यात आलेली असून या कामांची अंदाजपत्रके रक्कम निश्चित नसते मात्र आलेल्या निविदाना सर्वसाधारण सभेने मंजुरी दिल्यानंतर कार्यारंभ आदेश दिला जाणार असल्याचे नगरपालिकेकडून सांगण्यात आले.