रत्नागिरी:- शहरातील शिवाजीनगर येथे रविवारी सायंकाळी 4.50 वाजण्याच्या सुमारास एका बिल्डींगच्या तळातील गाळ्याला आग लागल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.
आग लागल्याचे वृत्त कळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. आगीने रौद्ररुप धारण करताच एमआयडीसी येथील अग्नीशमन बंब बोलावण्यात आला. आगीत गाळ्यातील साहित्याचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. अग्नीशमन बंबाने आग आटोक्यात आणण्यात आली.