रत्नागिरी:-शहरातील शहर बसस्थानक येथे अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याचा आरोप असलेल्या संशयिताची न्यायालयाने 50 हजाराच्या जामिनावर मुक्तता केली. फहाद नुरूद्दीन शेख असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 354 व पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच पोलिसांकडून संशयित आरोपी फहाद याला अटक करण्यात आली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 सप्टेंबर 2023 रोजी पीडित अल्पवयीन मुलगी ही शहर बसस्थानक येथे उभी होती. यावेळी संशयित आरोपी फहाद हा त्या ठिकाणी आला फहाद याने महिलेची ओढणी आढून तिच्याशी गैरवर्तन केले, अशी तक्रार पीडितेने शहर पोलिसांत दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी फहाद याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. दरम्यान फहाद याच्यावतीने जामिनासाठी सत्र न्यायालयापुढे अर्ज दाखल केला होता. रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांनी जामीन अर्जावर निकाल दिला फहाद याच्यावतीने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत लोक अभिरक्षक कार्यालय रत्नागिरीचे उपमुख्य लोक अभिरक्षक ऍड़ उन्मेष उदय मुळ्ये यांनी काम पाहिले.