रत्नागिरी शहर आणि परिसरात कोरोनाचा वाढता फैलाव 

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. रत्नागिरी तालुक्यातही वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय ठरत आहे. रत्नागिरी शहर आणि नजीकच्या परिसरात कोरोनाचा वाढता फैलाव चिंतेची बाब ठरत आहे. 
 

बुधवारी आलेल्या अहवालानुसार रत्नागिरी तालुक्यात 17 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडून आले आहेत. यात रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर, दामले विद्यालय शेजारी, तेली आळी भागात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. 

रत्नागिरी शहरासह फणसोप येथे एकाच घरातील चार, आंबेशेत, कर्ला, कासारवेली, खेडशी, करवांचीवाडी, निवळी या भागासह चिपळूण आणि वांद्री येथील सिविल ऍडमिट दोघांना कोरोनाची लागण झाली आहे.