रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील रेल्वेत संशयास्पद बॅगा असल्याचा फोन अन्…

रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गांवर रत्नागिरी स्थानकात हजरत निजामुद्दीन एर्नाकुलम गाडीत 5 संशयास्पद बॅगा असल्याचा फोन गुरुवारी रात्री 9 वाजन्याच्या सुमारास रेल पोलीस अधिकारी अजित मधाळे यांना आला. प्रजासत्ताक दिनाची पूर्वसंध्या होती, अशावेळी अलर्ट झालेल्या मधाळे आपल्या पथकासह रत्नागिरी स्थानाकावर दाखल झाले. त्यांच्या समवेत उपविभागीय पोलीस अधिकारी विनीत चौधरी, पोलीस निरीक्षक कावतकर, दहशतवाद विरोधी पथक (एटीएस ) हेही घटनास्थळी आले. बोगितील बॅगा बाहेर काढण्यात आल्या. त्यांची बॉम्ब स्कॉड आणि डॉग स्कॉडमार्फत कसून तपासणी करण्यात आली. सुमारे 45 मिनिटाहून अधिक काळ तपासणी केली गेली. 45 मिनिटातील प्रत्येक क्षण प्रत्येकसाठीच कसोटीचा होता.

पण अखेरीस त्या बॅगामध्ये फक्त काचेचे साहित्य असल्याचे आढळून आले आणि सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.त्या बॅगांची तपासणी केल्यानंतर कोणतेही धोकादायक साहित्य सापडले नाही. त्यामुळे यंत्रणानी निश्वास सोडला. हा प्रकार गुरुवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडला. कोकण रेल्वे मार्गांवर धावणारी हजरत निजामुद्दीन ते एर्नाकुलम ही गाडी नऊ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी स्थानकात दाखल झाली. त्यावेळी या गाडीच्या दोन डब्यात पाच बॅगा संशयस्पदरित्या ठेवल्याचे प्रवाशांनी सांगितल्यानंतर हा प्रकार घडला. मात्र या बॅगा कुणी ठेवल्या याचा शोध पोलीस घेत आहेत.